कोरोनाचा कहर ओसरल्या नंतर म्हणजेच लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या अडचणी आणि त्यावरील उपाय
*कोरोनाचा कहर ओसरल्या नंतर म्हणजेच लॉक डाऊन नंतर येणाऱ्या समस्या ( अडचणी ) आणि त्यावरील उपाय !*
-----------------------------–-
*A) येणाऱ्या अडचणी / समस्या*
1) अनेकांच्या नौकऱ्या जाऊ शकतात किंवा पेमेंट कमी होऊ शकते .
2) बिझनेस अडचणीत येऊ शकतात किंवा आपले प्रॉफिट कमी होऊ शकते !
3) एक जॉब गेल्या नंतर दुसरा जॉब मिळणे कठीण होऊ शकते !
4) आज आपल्याला जी काय लक्झरी मिळते नौकरीच्या ठिकाणी किंवा घरी " ती " भविष्यात कमी होऊ शकते ! ( निदान काही काळ तरी मिळणार नाही )
5) यात कोणत्याही
शासनाची काहीही चूक असणार नाही !
6) कोरोनामुळे घडणाऱ्या जागतिक घडामोडींचा तो दुष्परिणाम असणार आहे !
7) आपले लिव्हिंग स्टँडर्ड डाऊन होऊ शकते !
8) एखाद्या वेळेस अगदी जेवणाचे सुद्धा वांदे होऊ शकतील !
*B) आपण काय उपाय करावेत ?*
---------------------------------
1) कोणत्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही , खचून जायचे नाही !
2) कोणतेही काम करण्याची लाज बाळगायची नाही !
3) फोर व्हीलर , टू व्हीलर चा वापर कमी करून सायकल व पायी चालणे यावर भर द्यावा लागेल !
4) इस्त्रीचे कपडे , सौंदर्य प्रसाधने , साबण , क्रीम अशा गोष्टी वापरणे बंद करावे लागेल , किंवा कमी करावे लागेल !
5) पुन्हा गरिबीत राहण्याचा प्रसंग येऊ शकतो !
6) अशा प्रसंगी कोणाला हासू नका , चिडवू नका , टोमणे मारू नका !
7) भांडणे , तंटे , न बोलणे या गोष्टी सोडून द्या !
8) भाऊ-भाऊ , बहिणी-बहिणी , बहीण-भाऊ , मित्र , शेजारी या सर्वांनाच एकमेकाला मदत करावी लागेल , त्या शिवाय गुजराण होणे अशक्य होईल !
9) सर्व जातीधर्मातील लोकांनी पहिल्या पेक्षा जास्त आपुलकीने राहणे गरजेचे असणार आहे !
10) लग्न , मौंज , दहावे , चौदावे अतिशय साधेपणाने करावे लागतील !
11) लग्न , मौंज किंवा कुठलेही तत्सम कार्य " मोठेपणात " न जाता साधे पणाने करावे लागेल . वास्तव स्वीकारावे लागेल , अनेक गोष्टी फक्त घरच्या घरी कराव्या लागतील !
12) विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावाच लागेल !
13) घरापासून 2
/3 Km. पर्यंतच्या कामाला जाण्यासाठी कुठल्याही , पेट्रोल डिझेलच्या वाहनाचा वापर टाळावा लागेल , म्हणजे तो करणे परवडणारे नसेल !
14) कुठलीही नवीन खरेदी जवळ जवळ बंदच करावी लागेल !
15) शेतीचे महत्व वाढेल असे वाटते , त्यामुळे शेती शक्यतो विकू नये !
16) जे कपडेलत्ते पूर्वी आपण सर्रास फेकून देत होतो , आता तसे करता येणार नाही !
17) लहानपणी जसे आपण एकमेकांचे अडजुने कपडे वापरायचो तसे करावे लागल्यास , अजिबात कमीपणा समजू नका !
--------------------------------
*C ) कौटुंबिक कलह*
1) माणूस आर्थिक अडचणीत सापडला की त्याची चीड चीड होत असते , बोलण्यावर संयम रहात नाही .....हे सगळे आपल्याला जाणीवपूर्वक टाळावे लागेल !
2) बायकांनी नवऱ्याला आर्थिक टंचाई वरून घालून पाडून बोलू नये , अपमानीत करू नये !
3) कोणत्याही गोष्टीची डिमांड करतांना , नवऱ्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी लागेल !
4) जे नवरे काही व्यसन करतात त्यांनी ते व्यसन सोडून द्यावे ! बऱ्याच घरात यावरूनच भांडणे होतात !
5) नवरा म्हणणार्याने घरी किंवा ऑफिस मध्ये बेताल , वायफट बडबड करू नये !
6) घरातील मुला-मुलांनी या सर्व गोष्टी समजून घ्याव्यात !
7) शाळांनी विद्यार्थ्याना खर्चिक प्रोजेक्ट्स देऊ नयेत !
8) चहा करणे ,भाजी चिरणे , कणिक तींबने , कप-बश्या विसळणे , झाडाझुड करणे , फरशी पुसणे , दुखत असल्यास आई वडिलांचे पाय दाबून देणे ....असे प्रोजेक्ट्स द्यावेत ! ( ही गोष्ट हसण्यावर नेण्याची नाही )
9) प्रत्येकाने आपले नाते संबंध जपावेत , त्यामुळे जगणे सुसह्य होते !
10) स्त्री पुरुषांनी ब्युटीपार्लरच्या सेवेचा लाभ घेणे टाळावे !
11) शारीरिक सौंदर्या पेक्षा वैचारिक सौंदर्य कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे !
12) पूर्वी सारखे खर्चीक पर्यटन न करता , कमीत कमी खर्चा मध्ये पर्यटन करावे !
13) पर्यटनाच्या व्याख्या व ठिकाणे बदलावी लागतील !
14) कॉलनीतल्या कॉलनीत अंगत-पंगत ( डबा पार्टी ) किंवा शेतात दशम्या धपाटे घेऊन जाणे याला सुद्धा पर्यटनच समजावे लागेल !

Comments
Post a Comment