ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा शोध लावणारी होती एक बोल्ड अभिनेत्री वाचा सविस्तर.
नमस्कार मित्रांनो
हेडी लमार
हॉलीवूड स्टार मेरिलीन मन्रोवर असंख्य पुस्तके वाचायला मिळतील. पण हेडी लमारला ते भाग्य मिळाले नाही. लमार ही मेरिलीनसारखीच देखणी होती, तितकीच बोल्ड दृश्ये तिने त्या काळातील चित्रपटात दिली होती. पण हेडी नुसतीच लावण्यवती नव्हती, तर विज्ञान व तंत्रज्ञानात तिला कमालीची गती होती. तब्बल सहा वेळा तिने विवाह केले. पण ते फार काळ टिकले नाहीत. सगळ्या नवऱ्यांनी तिच्या अफाट संपत्तीचा मुक्तहस्ते वापर केला. संसारात व चित्रपटांत मन रमत नसल्याने या झगमगाटी दुनियेपासून दूर जाण्यासाठी तिने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला.
रेडिओ ध्वनिलहरींवर तिने काम सुरू केले. आज आपण ज्याला वायफाय व ब्लूटूथ wireless तंत्रज्ञान म्हणून ओळखतो त्याचा शोध हेडी लमारने लावला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकी पाणबुड्यांमध्ये याचा प्रथम वापर केला. याचे पेटंटही हेडी लमारने घेतले होते. मात्र पेटंटला ठराविक मुदत असते, हे हेडीला माहीत नव्हते.
साधारण २५ वर्षांपूर्वी जगभरात हे तंत्रज्ञान उपलब्ध झाले. या काळात हेडी लमारची आर्थिक स्थिती ढासळली होती. भिकार चित्रपट काढून तिने कमावलेला सगळा पैसा गमावला. कुठल्या तरी अंधाऱ्या घरात ती राहू लागली. तिच्या मैत्रिणीने वायफायच्या संशोधनाबद्दल तिला पैसे मिळावेत यासाठी चिकार प्रयत्न केले, पण तिच्या पेटंटची मुदतच संपल्याने कोणीही तिला पैसे दिलेच नाहीत. एका विज्ञानविषयक संस्थेने तिचा या संशोधनाबद्दल सत्कार केला एवढेच. अत्यंत कंगाल अवस्थेत ही देखणी आणि बुद्धिमान अभिनेत्री झुरून झुरून गेली!
तिने शोधलेल्या तंत्रज्ञानाचे पेटंट तिच्याकडे असते तर २० अब्ज डॉलरची ती मालकीण असती व शेवटपर्यंत रुबाबात जगली असती. पण एखादीच चूक आयुष्याला कशी कलाटणी देते त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण !

Comments
Post a Comment